Ad will apear here
Next
‘पुलं’च्या स्मृतिदिनानिमित्त गप्पा-आठवणी-गाण्यांची ऑनलाइन मैफल (व्हिडिओ)
पुणे : पुण्यभूषण पुरस्कारासाठी सात-आठ नावे भाईंनी सुचवली होती... ‘‘पुलं’मुळेच माझे वक्तृत्व बहरले,’ असे तत्कालीन केंद्रीय मंत्री मधू दंडवते यांनी सांगितले होते... ‘‘पुलं’ची ओळख मी करून देणार,’ असं सांगण्यासाठी कवयित्री शांताबाई शेळके यांनी निनावी फोन केला होता.... पु. ल. देशपांडे यांच्या अशा अनेक आठवणींना उजाळा देणारी ऑनलाइन मैफल नुकतीच ‘पुलं’च्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त रंगली होती. 

‘आम्ही एकपात्री, महाराष्ट्र’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या फेसबुक लाइव्ह मैफलीचे नाव होते ‘पुण्यभूषण ते पुलोत्सव’ आणि ‘तुमचे आमचे पुलं’. ‘त्रिदल’ संस्थेचे संस्थापक डॉ. सतीश देसाई यांच्याशी ‘आम्ही एकपात्री’चे अध्यक्ष संतोष चोरडिया यांनी संवाद साधला. पुण्यभूषण पुरस्काराची सुचलेली संकल्पना, ‘पुलं’नी तो स्वीकारल्यानंतरची भावना, बालगंधर्व रंगमंदिरात झालेली अभूतपूर्व गर्दी, ‘पुलं’च्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जगभरात साजरा झालेला ‘ग्लोबल पुलोत्सव’ अशा विविध स्मृतींना सतीश देसाई यांनी उजाळा दिला.

त्यानंतर ‘आम्ही एकपात्री’चे कलाकार वंदन नगरकर यांनी ‘रामनगरी’ या पुस्तकातील ‘पुलं’च्या प्रस्तावनेचे अभिवाचन केले. बंडा जोशी यांनी पुलंची आकाशवाणीतील आठवण सांगितली. डॉ.  कविता घिया यांनी ‘पुलं’च्या कार्याला आणि त्यांच्या चित्रपटांना शब्दांत गुंफून स्वरचित कविता सादर केली. रत्ना दहिवेलकर यांनी ‘पुलं’ना आलेले रसिकांचे अनुभव कथन केले. लेखनासाठी ‘पुलं’नी कसे प्रोत्साहन दिले, हे मारुती यादव यांनी सांगितले. गायिका अनुपमा खरे यांनी कौसल्येचा राम, नाच रे मोरा ही गाणी सादर केली. या ऑनलाइन मैफलीचे सूत्रसंचालन संतोष चोरडिया यांनी केले. जगभरातील रसिकांना हा सोहळा अनुभवता आला.

(व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HYWSCN
Similar Posts
‘पुलं’विषयी वेगळी आपुलकी’ ‘मी वाचतो भरपूर; पण सर्व लेखकांच्या तुलनेत ‘पुलं’विषयी एक वेगळी आपुलकी आहे, जवळीक आहे....’ हे विचार आहेत आजच्या पिढीतला अभ्यासू अभिनेता आणि ‘व्यक्ती आणि वल्ली’ नाटकात साक्षात ‘पुलं’चीच भूमिका साकारण्याचं भाग्य लाभलेला रंगकर्मी आनंद इंगळे याचे. ‘पुलं’च्या जयंतीनिमित्त आनंदनं त्यांच्याबद्दलच्या भावना ‘बाइट्स ऑफ इंडिया’कडे व्यक्त केल्या
‘पुलसुनीत’ ठरणार दातृत्वामधील दुवा रत्नागिरी : पु. ल. देशपांडे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून आपल्याला माहिती आहेत. लेखनासह विविध कलांच्या त्यांनी केलेल्या आविष्काराचा आनंद आपण कोणत्या ना कोणत्या रूपात लुटत असतो. त्या पलीकडेही दातृत्व हा त्यांच्या जीवनाचा एक मोठा पैलू होता. समाजात तो पैलू वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने ‘पुलं’च्या जन्मशताब्दीनिमित्ताने
... आणि गुगलवर झळकलं ‘पुलं’चं डूडल! पु. ल. देशपांडे... सकल मराठी जनांच्या मनांवर अधिराज्य गाजवणारं नाव... आज, अर्थात आठ नोव्हेंबर २०२० रोजी ‘पुलं’ची १०१वी जयंती आहे. त्या निमित्ताने गुगलने ‘पुलं’वर डूडल करून महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तिमत्त्वाला आदरांजली वाहिली आहे. मुंबईतले चित्रकार समीर कुलावूर यांनी हे डूडल साकारलं आहे. गुगलचं हे डूडल भारतात सर्वत्र दिसणार आहे
‘पुलं’ची शब्दकळा समाजजीवनाचे मर्म टिपणारी रत्नागिरी : ‘पु. ल. देशपांडे यांनी त्यांच्या लेखनात समाजजीवनाचे मर्म टिपले आणि नुसते सांगण्यापेक्षा काही तरी करून सांगावे अशी त्यांची शब्दकळा होती. ‘परफॉर्मन्स स्किल’ हा त्यांच्या लेखनाचा स्थायीभाव होता. तो मला भावला. त्यांच्या अशा वैशिष्ट्यपूर्ण शब्दकळेमुळेच ज्यांना त्यांच्या आवाजाची सवय आहे, त्यांना

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language